नागपूर संत्री, पेरुची आवक वाढली | पुढारी

नागपूर संत्री, पेरुची आवक वाढली

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  उत्तर भारतीयांच्या छटपूजा या सणामुळे गेल्या आठवड्यात वाढलेल्या फळांच्या दरात सध्या काहीशी घट झाली आहे. डेंग्यूची रुग्णसंख्या वाढल्याने सध्या पपई आणि किवी या फळांना मागणी आहे. मोशी फळबाजारात नागपूर संत्री आणि पेरू यांची रविवारी चांगली आवक झाली. छटपूजा सणामुळे गेल्या आठवड्यात फळांच्या दरामध्ये जवळपास 20 टक्के वाढ झाली होती. तसेच, सणाच्या काळात फळांच्या मागणीत वाढ झाली होती.

दरम्यान, गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळांची मागणी घटली असून दरातही 10 टक्के घट झाली आहे. सफरचंद आणि अंजीर या फळांचा हंगाम सध्या सुरु झाला आहे. विविध जातीतील सफरचंद बाजारपेठेत विक्रीसाठी असून त्याचे दर 80 रुपये प्रति किलोपासून थेट 200 रुपये प्रति किलोपर्यंत आहेत. अंजीराची विक्री प्रति किलो 100 ते 150 रुपये या दराने होत आहे. सध्या चिक्कू, कलिंगड, खरबूज आदी फळांचा हंगाम नसल्याने ही फळे महाग झाली आहेत; तसेच बाजारात नागपूरची संत्री आणि पेरूची देखील मोठी आवक झाली आहे.

फळे किरकोळ भाव
(प्रति किलो)
सफरचंद (कश्मिरी) 80 ते 100
सफरचंद (सिमला किनोर) 120 ते 150
सफरचंद (रॉयल गाला) 180 ते 200
डाळिंब 100 ते 200
संत्रा 50 ते 100
मोसंबी 50 ते 120
चिक्कू 120 ते 150
पेरु 30 ते 100
सीताफळ 30 ते 100
पपई 40 ते 60
खरबूज 80 ते 100
अननस 50 ते 80 (प्रति नग)
कलिंगड 30 ते 40
किवी 120 (3 नग बॉक्स)
केळी 30 ते 50 (प्रति डझन)
अंजीर 100 ते 150

Back to top button