विहिरीतील बछड्याला जीवदान | पुढारी

विहिरीतील बछड्याला जीवदान

शिक्रापूर : पुढारी वृत्तसेवा :  शिरूर तालुक्यातील करंदी (ता. शिरूर) येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला जीवदान देण्यात शिरूर वन विभाग व प्राणिमित्रांना यश आले आहे. करंदी येथील कौडाळ मळा येथील अशोक पर्‍हाड हे शनिवारी (दि. 5) दुपारच्या सुमारास शेतात गेले असता त्यांना विहिरीमध्ये बिबट्याचा बछडा पडल्याचे दिसून आले. याबाबतची माहिती त्यांनी शिरूर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांना दिली.

लगेचच वनरक्षक बबन दहातोंडे, वनमजूर आनंदा हरगुडे, पोलिस पाटील वंदना साबळे पाटील, सर्पमित्र शेरखान शेख, अमोल कुसाळकर, गणेश टिळेकर, वैभव निकाळजे, श्रीकांत नायकोडी यांनी तेथे धाव घेत विहिरीची पाहणी करत शेख यांनी शिताफीने विहिरीमध्ये पडलेल्या पाण्यातून वर काढले. यावेळी सरपंच सोनाली ढोकले, उपसरपंच पांडुरंग ढोकले, राजाभाऊ ढोकले, ग्रामपंचायत सदस्य नितीन ढोकले, संदीप ढोकले, माजी उपसरपंच लहू दरेकर आदी उपस्थित होते. दरम्यान विहिरीतून बाहेर काढलेल्या नर प्रजातीच्या या बिबट्याच्या बछड्यावर प्राथमिक उपचार करत वनविभागाच्या वतीने त्याला निसर्गाच्या सानिध्यात मुक्त
करण्यात आले.

Back to top button