पोलिसांत फिर्याद दिल्याच्या रागातून महिलेवर कोयत्याने वार | पुढारी

पोलिसांत फिर्याद दिल्याच्या रागातून महिलेवर कोयत्याने वार

पिंपरी :  पुढारी वृत्तसेवा :  जुन्या भांडणाच्या कारणावरून पोलिसांत फिर्याद दिल्याच्या रागातून एका 24 वर्षीय महिलेवर शेजारच्या तरुणाने कोयत्याने डोक्यावर वार केल्याची घटना पिंपरी येथील भाजी मंडईजवळ शुक्रवार (दि. 4) घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला फिर्यादी (24) यांच्या शेजारी राहणारा आरोपी लड्या ऊर्फ हर्ष अमर बहोत (19 रा. सेनेट्री चाळ, भाजी मंडईजवळ, पिंपरी) याच्या विरोधात फिर्यादीने जुन्या भांडणाच्या कारणावरून तक्रार केली होती.

याचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादीच्या हातावर, डोक्यावर कोयत्याचा वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. याविरोधात फिर्यादीने पिंपरी पोलिस ठाण्यात शुक्रवारी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अद्याप फरार आहे.

Back to top button