पिंपरी : तुळशी विवाहास प्रारंभ; साहित्य खरेदीस गर्दी | पुढारी

पिंपरी : तुळशी विवाहास प्रारंभ; साहित्य खरेदीस गर्दी

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  तुळशी विवाहास शनिवार (दि. 5) रोजी प्रारंभ झाला. बाजारात तुळशी विवाहासाठी लागणारे साहित्य विक्रीस उपलब्ध झाले असून, तुळशी विवाहानिमित्त साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. तुळशी विवाह हा गोरज मुहूर्तावर म्हणजे सायंकाळी केला जातो. विवाह सोहळ्याप्रमाणे तुळशी विवाह सोहळा पार पाडला जातो. आप्तस्वकीय, नातेवाइकांच्या सोबतीने तसेच दिवाळीतील फराळ नैवेद्य दाखविला जातो.

तुळशी विवाहासाठी ऊस तसेच बोर, आवळा, सीताफळ, पेरू, तसेच ऋतूतील उपलब्ध फळे, पूजेचे सर्व साहित्य, वस्त्र, फुलांच्या माळा, सौभाग्याचे सर्व सामान, हळद आदी वस्तू बाजारात उपलब्ध आहेत. विवाहाच्या वेळी लाल वस्त्र व सौभाग्य दागिन्यांनी तुळशीला सजविले जाते व विवाह लावला जातो. फटाक्यांची आतषबाजी केली जाते. अशाप्रकारे तुळशी विवाहापासून लग्नतिथींना आजपासून सुरुवात
झाली आहे.

Back to top button