पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्यात कार्यरत असलेल्या 307 कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये गतवर्ष 2021-22 मध्ये सुमारे 60 हजार कोटी रुपये आणि थेट पणन परवाना, एकल परवाना आणि खासगी बाजारांमध्ये मिळून सुमारे 12 ते 15 हजार कोटींची वार्षिक उलाढाल झाली आहे. त्यामुळे गतवर्षी शेतमाल बाजारव्यवस्थेतील एकूण उलाढाल सुमारे 75 हजार कोटी रुपयांवर पोहचल्याची माहिती पणन संचालक सुनील पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शेतकर्यांना बाजार सुविधा पर्याय निर्माण झाल्यामुळे स्पर्धा वाढून शेतमालास वाजवी दर आणि बाजार समित्यांच्या कामकाजातही सुधारणा झाल्याचे नमूद करून ते म्हणाले, महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम 1963 मध्ये सन 2005 मध्ये सुधारणा करण्यात आली. त्याअन्वये कृषी उत्पन्न बाजार समित्यांशिवाय थेट पणन, एकल परवाना, खासगी बाजार सुरू करण्यासाठी तरतुदी समाविष्ट करण्यात आल्या. शेतकर्यांकडील कृषी उत्पन्नाची थेट खरेदी करण्यासाठी विविध व्यक्ती, कंपन्या, संस्था, शेतकरी, शेतकरी गट इत्यादींना थेट पणन परवाने पणन संचालनालयामार्फत देण्यात येतात.
राज्यात 1 हजार 460 थेट पणन परवानाधारक कार्यरत असून, त्यांनी गतवर्ष 2021-22 मध्ये सुमारे 1 हजार 368 कोटी रुपयांची उलाढाल केलेली आहे. एक किंवा अधिक बाजार आवारांमध्ये शेतमालाची थेट खरेदी करता यावी, यासाठी एकल परवाना (सिंगल लायसेन्स) देण्यात येतो. त्यातून 2021-22 मध्ये 33 परवानाधारकांकडून 5 हजार 563 कोटी 17 लाखांची उलाढाल केली आहे. तसेच पणनव्यवस्थेत बदल करण्यासाठी खासगी निधीची गुंतवणूक करणे व शेतकर्यांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून राज्यात सध्या 73 खासगी बाजार परवानाधारक आहेत.
त्यांनी 2021-22 मध्ये 4 हजार 555 कोटी 84 लाख रुपयांइतकी उलाढाल केली आहे. काही वस्तूंवर बाजार फी (सेस) नसली तरी चांगली उलाढाल होते आणि हा आकडाही मोठा असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, शनिवारी पणन संचालनालयात नाशिक येथील मोहाडी (ता. दिंडोरी) येथील सह्याद्री फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड यांना सह्याद्री फार्मर्स प्रायव्हेट अॅग्रिकल्चर मार्केट लिमिटेड या नावाने खासगी परवाना सह्याद्रीचे चेअरमन विलास शिंदे यांना पणन संचालक सुनील पवार यांच्या हस्ते बुधवारी देण्यात आला.
या प्रसंगी पणन सहसंचालक विनायक कोकरे, पणन उपसंचालक अविनाश देशमुख, नितीन काळे, डॉ. विवेक भिडे व अन्य अधिकारी उपस्थित होते. राज्यातील शेतकरी उत्पादक कंपनीचा हा पहिलाच खासगी बाजार होणार असल्याचे पवार यांनी पत्रकारांना
गतवर्षी बाजार व्यवस्थेअंतर्गत शेतमालाची झालेली वार्षिक उलाढाल.
क्र. आर्थिक वर्ष परवाना पध्दत व संख्या झालेली उलाढाल
1. 2021-22 थेट परवाना -1460 1,368 कोटी
2. 2021-22 एकल परवाना -33 5,563.17 कोटी
3. 2021-22 खासगी बाजार- 73 4,555.84 कोटी
4. 2021-22 बाजार समित्या -307 60,000 कोटीसांगितले.