पिंपरी : खुनाचा बदला घेणारे स्टेटस ठेवल्याने अटक

पिंपरी : सराईत गुन्हेगार पवन लष्करे याच्या खुनाचा बदला घेण्याचे स्टेटस ठेवल्याने पोलिसांनी एकाला अटक केली आहे. गुरुवारी (दि. 3) पिंपरी येथे ही कारवाई करण्यात आली. अर्जून भीमराव वंजारी (24, रा. शरदनगर, चिखली) याला अटक केली आहे. तसेच त्याचा साथीदार आतिष काळे याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार मोहसीन शेख यांनी फिर्याद दिली आहे.
सराईत गुन्हेगार पवन लष्करे याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आरोपी अतिश काळे याने एक व्हिडीओ बनवला. यामध्ये ‘ए दोस्त अपनी दोस्ती की मिसाल एक ना एक दिन जरूर देंगे, चाहे कितने भी दिन गुजर जाए तेरी मौत का बदला हम जरूर लेंगे’, असा मजकूर होता. दरम्यान, तो व्हिडीओ आरोपी अर्जुन वंजारी याने स्टेट्सला ठेवला होता. ही बाब निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करीत कारवाई केली. पिंपरी पोलिस तपास करीत आहेत.