पुणे : कोरड्या हवामानामुळे थंडी! किमान तापमान 13.1 अंशांवर | पुढारी

पुणे : कोरड्या हवामानामुळे थंडी! किमान तापमान 13.1 अंशांवर

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्यातील बहुतांश शहरांच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. मात्र, पुणे शहर आणि परिसरात किमान तापमानात घट झाली आहे. त्यामुळे थंडीत थोडीशी वाढ झाली आहे. शुक्रवारी शहरात 13.1 किमान तापमानाची नोंद झाली. सरासरीच्या उणे 2.7 अंशांनी तापमानात घट झाली आहे.

पश्चिमी चक्रवाताचा कमी झालेला प्रभाव, त्यामुळे उत्तर भारतातून राज्याकडे थंड वारे वाहण्याचे प्रमाण अचानक कमी झाले. त्यामुळे राज्यातील किमान तापमानात वाढ झाली आहे. अगदी शुक्रवारी देखील राज्यातील बहुतांश शहरांचे किमान तापमान 13 अंश सेल्सिअसच्या पुढे असल्याचे नोंद झाले. दरम्यान, पुणे शहर आणि परिसराच्या किमान तापमानात घट झाली, असे हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आले. शहरात पुढील पाच दिवस किमान तापमान 12 ते 14 अंश सेल्सिअसच्या आसपास राहणार आहे.

Back to top button