पुणे : फरार सराईत रूपेश मारणेला साथीदारासह अटक; गुन्हे शाखेची कारवाई | पुढारी

पुणे : फरार सराईत रूपेश मारणेला साथीदारासह अटक; गुन्हे शाखेची कारवाई

पुणे; पुढारी वृत्तसेवा: बांधकाम व्यावसायिकाकडून ६५ लाखांची खंडणी मागणारा आणि मोक्का गुन्ह्यात फरारी असलेल्या सराईत रूपेश मारणे आणि साथीदाराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुळशी परिसरातुन अटक केली आहे. त्यामुळे कुख्यात गजा मारणे आणि टोळीचे कंबरडे मोडण्यास मदत होणार आहे.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या पथकाने दोघांनाही मुळशी परिसरातुन ताब्यात घेतले. सराईत रुपेश मारणे आणि संतोष शेलार अशी अटक केलेल्याची नावे आहेत.

Back to top button