बारामतीत गोळीबाराचा थरार, सायंकाळी घडलेल्या घटनेने खळबळ | पुढारी

बारामतीत गोळीबाराचा थरार, सायंकाळी घडलेल्या घटनेने खळबळ

बारामती, पुढारी वृत्तसेवा: खुनासह गंभीर गुन्ह्यान्मुळे आधीच चर्चेत असलेल्या बारामती शहरात गुरुवारी (दि. ३) सायंकाळी भिगवण रस्त्यावर फायरिंगचा प्रकार घडला. या घटनेमुळे बारामतीत खळबळ उडाली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्यासह तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

गोळीबारात शहरातील तांदूळवाडी येथील हा युवक जखमी झाला आहे. उपचारासाठी त्याला बारामती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दुचाकीवरुन आलेल्या इसमांनी हा गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती आहे.

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)

Back to top button