बारामती : अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई

बारामती : बारामती शहर पोलिसांनी शहरातील साठेनगर तसेच शहरालगतच्या गुणवडी येथील अवैध गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर कारवाई केली. पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी ही माहिती दिली. गुणवडीतील ढेलेवस्ती येथे संदीप ऊर्फ दाद्या तुकाराम सकट (वय 27) हा कुटुंबीयांच्या मदतीने हातभट्टी विकत असल्याची माहिती महाडिक यांना मिळाली होती. त्यानुसार सहायक फौजदार संजय जगदाळे, पोलिस नाईक दशरथ कोळेकर, कल्याण खांडेकर, तुषार चव्हाण, महिला पोलिस निगडे आदींनी छापा टाकला. या वेळी तेथे वीस लिटर गावठी दारूचा कॅन आढळून आला. पोलिसांनी सकट याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने आमचा तपास सध्या सुरू आहे.
– गजानन पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लोणीकंद पोलिस ठाणे