पिंपरी : सात लाखांची दिघी येथे चोरी | पुढारी

पिंपरी : सात लाखांची दिघी येथे चोरी

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: घराच्या उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून चोरट्याने सात लाख 37 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 26) दुपारी दिघी गावठाण येथे उघडकीस आली. सचिन नंदकुमार येळवंडे (37, रा. दिघी गावठाण) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी आठ ते बुधवारी दुपारी चारच्या कालावधीत फिर्यादी यांच्या घराच्या उघड्या दरवाजावाटे अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला.

घरातून दहा तोळ्याचे मंगळसूत्र, अडीच तोळ्याची माळ, पाच तोळ्याची मोहनमाळ, पाच तोळ्याची पोत, पाच तोळ्याची साखळी असे एकूण 27.5 तोळे सोन्याचे दागिने आणि 50 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण सात लाख 37 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला.

Back to top button