कामशेत : वारंवार ‘सर्व्हर डाउन’मुळे नागरिक त्रस्त

कामशेत : वारंवार ‘सर्व्हर डाउन’मुळे नागरिक त्रस्त
Published on
Updated on

कामशेत : पुढारी वृत्तसेवा :  कामशेत येथील सर्व बँकेतील इंटरनेटचा वेग कमी होणे, सर्व्हर अचानक डाउन होऊन अचानक कामकाज ठप्प होणे हे कामशेतकरांना नेहमीचेच झाले आहे. नाणे मावळवासियांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. नाणे मावळमध्ये सुमारे 15 गावे आहेत. नाणे मावळचे शेवटचे टोक म्हणजे कोंडेश्वर मंदिर व जांभवली, गोवित्री, करंजगाव, कांब्रे, नाणे, उकसान, थोरण इत्यादी गावातील ग्रामस्थांना बँकेसाठी कामशेतला यावे लागते.

मावळवासियांना एकमेव जवळ असलेली राष्ट्रीयकृत बँक ही बँक ऑफ महाराष्ट्र कामशेत शाखा असल्याने तब्बल 25 ते 30 किलोमीटर लांबून प्रवास करीत यावे लागते. या प्रवासात आर्थिक भुर्दंड तर बसतोच शिवाय एवढ्या लांब प्रवास करून जर तांत्रिक बिघाडामुळे कामकाज बंद, असे सांगितल्यानंतर बघितल्यानंतर मानसिक त्रास सहन करावा लागतो.हीच अवस्था पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये सर्व्हर डाऊनमुळें खातेदारांची पासबुक वेळेवर भरून मिळत नाही, ही अडचण विशेषतः शेतकर्‍यांना येत आहे.

कोरोना काळानंतर व्यावसायिक अर्थचक्र रुळावर येत असताना बँकांचे सतत असणार्‍या 'सर्व्हर डाउन'मुळे व्यावसायिक व ज्येष्ठ नागरिक यांना बँकांचे उंबरठे झिजवावे लागतात. महत्वाचे व्यवहार, कॅश क्रेडिटसारखी कामे पूर्ण होण्यासाठी दिवसातून किमान तीन वेळा चकरा माराव्या लागतात. बँकांचे सर्व्हर डाउन झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बँकेत पासबुक छापून घेणे, खाते उघडणे अशा असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

मागील तीन दिवसांपासून बँकेचे सर्व्हर डाउन असल्याने नागरिकांची गैरसोय होणे साहजिक आहे. परंतु या गैरसोयींचे निवारण होण्यासाठी आम्ही ऑनलाईन तक्रार केली आहे. लवकरच सर्व सुविधा सुरळीत होतील.
                             -शैलेश कोरगावकर, व्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र

मागील बर्‍याच दिवसांपासून हा त्रास सहन करावा लागत आहे. त्यात पासबुक प्रिंटिंगचा प्रॉब्लेम आहे त्यासाठी दिवसातून किमान चार वेळा चकरा माराव्या लागतात.
                                                    -विपुल जाधव, रहिवासी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news