पिंपरी : पोस्टाच्या गुंतवणुकीत 40 टक्क्यांनी वाढ

पिंपरी : पोस्टाच्या गुंतवणुकीत 40 टक्क्यांनी वाढ

नंदकुमार सातुर्डेकर : 

पिंपरी : गुंतवणुकीवर मिळणारे चांगले व्याज आणि गुंतवलेले पैसे सुरक्षित राहण्याची खात्री असल्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांनी गुंतवणुकीसाठी पोस्टाला पसंती दिली आहे. गेल्या सहा महिन्यांत पोस्टाच्या गुंतवणुकीत 40 टक्के वाढ झाली आहे.
पोस्टाच्या विविध योजनांमध्ये 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2022 या सहा महिन्यांच्या कालावधीत 38 हजार 970
लोकांनी गुंतवणूक केली आहे.

सीनिअर सिटीझन खात्यामध्ये 2 हजार 544 जणांच्या ठेवी
गेल्या सहा महिन्यांत शहरातील 30 पोस्ट ऑफिसमध्ये 38 हजार 970 जणांनी विविध योजनांमध्ये गुंतवणूक केली आहे. सीनियर सिटीजन खात्यामध्ये 2 हजार 544, रिकरिंग डिपॉझिटमध्ये 12 हजार 5 , सेविंग खात्यामध्ये 4 हजार 673, मुदत ठेवीत 6 हजार 995, पब्लिक प्रोविडेंट फंडमध्ये 925 लोकांनी गुंतवणूक केली आहे. मासिक उत्पन्न योजनेत 3 हजार 101 ,नॅशनल सेविंग सर्टिफिकेटमध्ये 5 हजार 132, किसान विकास पत्रात 1216 नागरिकांनी गुंतवणूक केली आहे.

डाक घर बचत बँकेच्या माध्यमातून पोस्टाने बसवला जम
कोरोना काळात सर्वकाही ठप्प झाले असताना पोस्टाने अधिक चांगली सेवा दिली. डाक घर बचत बँकेच्या माध्यमातून पोस्टाने आपला जम बसवला आहे. कोरोनाच्या काळापासून गुंतवणुकीसाठी लोक पोस्टाला अधिक पसंती देत आहेत. शहरात विविध 30 ठिकाणी असलेल्या पोस्ट ऑफिसमार्फत लोकांना चांगली सेवा दिली जात आहे. आकुर्डी, अँम्युनिशन फॅक्टरी, औंध कॅम्प, भोसरी, भोसरी गाव, सीएमई, चिखली, चिंचवड ईस्ट, चिंचवडगाव, दापोडी बाजार, दापोडी, ईस्ट खडकी, एच. ए. फॅक्टरी, इंद्रायणीनगर, कासारवाडी, इन्फोटेक पार्क हिंजवडी, खडकी बाजार, खडकी, फुलेनगर, माण, मासुळकर कॉलनी, नेहरुनगर, प्राधिकरण, पिंपळे गुरव, पिंपरी कॉलनी, पिंपरी पीएफएसओ, पिंपरी वाघेरे, रुपीनगर, सांगवी, यमुनानगर याठिकाणी पोस्टाची ऑफिसेस आहेत.

व्याजदर जास्त असल्याने तसेच गुंतवलेली रक्कम सुरक्षित राहण्याचे खात्री असल्यामुळे पोस्टात सर्वसामान्यांपासून उच्चभ्रू नागरिकांपर्यंत गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. शहरातील 30 पोस्ट ऑफिसमधील 450 कर्मचारी नागरिकांना अधिकाधिक सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत. दिनांक 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2022 या सहा महिन्यांच्या कालावधीत 38 हजार 970 नागरिकांनी विविध योजनेत गुंतवणूक केली आहे. गुंतवणुकीत 40 टक्के वाढ झाली आहे.
                                  – के. एस. पारखी, जनसंपर्क निरीक्षक, पोस्ट ऑफीस

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news