तीन दिवस पाणीपुरवठा बंद; जलवाहिनी फुटत असल्याने पौडकर हैराण

file photo
file photo

पौड; पुढारी वृत्तसेवा : मुळशी तालुक्यातील प्रमुख गाव असलेले पौड या ठिकाणी ऐन सणासुदीच्या काळात गेले तीन दिवस पाणी न आल्याने आणि एकाच ठिकाणी जलवाहिनी सतत फुटत असल्याने पौडकर हैराण झाले आहेत. मुळशी धरणातून मुळशी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेतून पौडला पाणीपुरवठा होतो. पाणीपट्टीची रक्कम मोठी थकीत असल्याने पौडला आधीच दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. मात्र ऐन सणासुदीच्या काळात दिसली येथे जलवाहिनी फुटल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

अनेक वेळा पाणीपुरवठा करणारी वाहिनी दिसली येथेच सतत फुटत आहे. पाणीपुरवठा करणारी वाहिनी फुटल्यामुळे गेले 3-4 दिवसांपासून पौड गावाला पाणीपुरवठा बंद आहे. जलवाहिनी फार जुनी व सिमेंटची असल्यामुळे वारंवार फुटत असल्याचे निदर्शनास आले आहे.

पौडला शुद्धीकरण केलेले पाणी मिळत नाही व पैसे आकारणी शुद्धीकरण पाण्याची केली जाते. फुटलेली जलवाहिनी लवकरात लवकर दुरुस्त करावी आणि त्या ठिकाणी लोखंडी जलवाहिनी बसवावी, अशी मागणी पौडचे सरपंच अजय कडू, उपसरपंच मोनाली ढोरे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद शेलार आणि सागर ढोरे यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news