कांदा उत्पादकांना दिवाळी पावली; जुन्नरला पन्नास हजार पिशव्यांची आवक | पुढारी

कांदा उत्पादकांना दिवाळी पावली; जुन्नरला पन्नास हजार पिशव्यांची आवक

लेण्याद्री; पुढारी वृत्तसेवा: गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर वधारत असल्याने खर्‍या अर्थाने कांदा उत्पादक शेतकर्‍यांची दिवाळी साजरी होत आहे. गेल्या काही महिन्यांत अतिरिक्त पावसामुळे कांद्याला मातीमोल भाव मिळत होते. आता मात्र समाधानकारक बाजार मिळत असल्याने शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, रविवारी (दि. 30) बाजार समितीच्या जुन्नर येथील मुख्य आवारात झालेल्या लिलावात 10753, ओतूर उपबाजारात 21460, तर आळेफाटा येथे 16290 पिशव्यांची आवक झाली, अशी माहिती सचिव रूपेश कवडे यांनी दिली.

सध्या सर्वत्र जुना कांदा विक्रीसाठी चाळीबाहेर काढला जात आहे. मात्र, हा जुना कांदा आता संपत आला असून, नवीन कांदा येण्यास दोन महिन्यांचा अवधी आहे. त्यामुळे कांदा दर वाढत आहे, अशी माहिती कांदा आडददार सुमीत परदेशी यांनी दिली. दरम्यान, नव्याने लागवड केलेल्या कांद्याला परतीच्या पावसाने झोडपल्यामुळे पुढे कांदा उत्पादन कमी होणार आहे, त्यामुळे बाजार चढे राहतील, अशी शक्यता कांदा व्यापारी सारंग घोलप यांनी व्यक्त केली.

कांदा लिलावातील बाजारभाव (प्रती 10 किलो)
गोळा – 300 ते 381
सुपर – 250 ते 335
गोल्टा – 100 ते 270
बदला – 100 ते 225

Back to top button