नायगाव-माळशिरस रस्त्याचे काम सुरू | पुढारी

नायगाव-माळशिरस रस्त्याचे काम सुरू

नायगाव; पुढारी वृत्तसेवा: पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील श्री क्षेत्र सिद्धेश्वर ते श्री क्षेत्र भुलेश्वर या दोन तीर्थक्षेत्रांना जोडणार्‍या नायगाव – माळशिरस या रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेले काम सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. नायगाव- माळशिरस रस्त्याचे काम खासदार सुप्रिया सुळे व आमदार संजय जगताप यांच्या प्रयत्नामुळे मार्गी लागले आहे.
या रस्त्यावरील खळदकर वस्ती, लोळे वस्ती व इतर नागरिकांचा प्रवास या रस्त्यामुळे सुखकर होणार आहे.

या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत दैनिक पुढारीने अनेक वेळा पाठपुरावा केला. आमदार संजय जगताप व माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रेय झुरुंगे यांच्या माध्यमातून तालुक्यासह माळशिरस बेलसर गटात रस्त्यांचे जाळे तयार झाले आहे. नायगाव माळशिरस रस्त्याचे काम मार्गी लागत असल्याने नायगाव ग्रामस्थ व श्री सिध्देश्वर महाराजांच्या दर्शनाला येणार्‍या भाविकांचा प्रवास सुखकर होईल, असे नायगावचे सरपंच बाळासाहेब कड यांनी सांगितले.

Back to top button