पुणे ते नागपूर प्रवास आठ तासांत शक्य!

पुणे ते नागपूर प्रवास आठ तासांत शक्य!

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे ते नागपूर असा प्रवास करताना प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला छत्रपती संभाजीनगरजवळ 'पुणे-संभाजीनगर (औरंगाबाद)' असा अ‍ॅक्सेस कंट्रोल देण्यात येणार आहे. हा अ‍ॅक्सेस ग्रीन एक्स्प्रेस-वेने जोडला जाणार आहे. यामुळे पुणेकरांचा पुणे-नागपूर हा प्रवास अवघ्या आठ तासांत शक्य होणार आहे.

तसेच, पुणे-संभाजीनगर अडीच तासांत, तर संभाजीनगर-नागपूर साडे-पाच तासांत शक्य होणार आहे, असे ट्विट केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. पुणे-नागपूर यादरम्यान प्रवाशांचा निम्मा दिवस प्रवासातच जातो. त्यामुळे मुंबई-नागपूर प्रस्तावित समृध्दी महामार्गाला औरंगाबादजवळ पुणे-नागपूर असा अ‍ॅक्सेस जोडण्यात येणार आहे. या नव्या प्रस्तावामुळे पुणेकर, नागपूरकर आणि संभाजीनगरमधील नागरिकांना प्रवासासाठी लागणारा मोठा वेळ वाचणार आहे. हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे (नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी) नवीन अलाइन्मेंट घेऊन तयार करण्यात येणार असल्याचेही गडकरी यांनी ट्विटमध्ये म्टले आहे.

अशी होणार वेळेची बचत…
सध्या पुण्याहून नागपूरला जाण्यासाठी 14 ते 15 तासांचा कालावधी लागत आहे. या नव्या मार्गामुळे पुणेकरांना फक्त आठ तासांतच नागपूर गाठता येणार आहे. तसेच, पुण्याहून औरंगाबादला जाण्यासाठी 6 ते 7 तास लागतात. या नव्या मार्गामुळे पुणे-औरंगाबाद अंतर फक्त अडीच तासांवर येईल, तर औरंगाबाद-नागपूर 9 ते 10 तास लागतात. नव्या मार्गामुळे फक्त साडेपाच तास लागणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news