ऑडी, फोर्ड, फेरारी अन् मारुती, महिंद्राही; दुर्मीळ गाड्यांचे प्रदर्शन पाहण्याची पुणेकरांना संधी

ऑडी, फोर्ड, फेरारी अन् मारुती, महिंद्राही; दुर्मीळ गाड्यांचे प्रदर्शन पाहण्याची पुणेकरांना संधी

पुणे; पुढारी वृत्तसेवा: मर्सिडीस बेंझ, फोर्ड, हमर, कूपर, फेरारी, जॅग्वार, ऑडी यांसारख्या परदेशी बनावटीच्या कार आणि भारतीय बनावटीच्या मारुती, हिंदुस्थान मोटर्स, महिंद्रा, टाटा कंपनीच्या जुन्या दुर्मीळ छोट्या वाहनांचे मॉडेल पुणेकरांना पाहता येणार आहेत.
संग्रहात 225 प्रकारच्या गाड्या सध्या जोशींच्या संग्रहात एकूण 225 मोटारींच्या प्रतिकृती आहेत. त्यामध्ये 175 परदेशी बनावटीच्या तर 50 भारतीय बनावटीच्या प्रतिकृती आहेत. 1923 सालाच्या फोर्ड बनावटीच्या ट्रकपासून सध्याच्या बीएमडब्ल्यूपर्यंतच्या प्रतिकृती या संग्रहात आहेत.

रत्नाकर जोशी यांचा हा छोट्या दुर्मीळ गाड्यांचा संग्रह असून, पर्वती येथील सह्याद्री मैदान येथे या गाड्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. येत्या 8 तारखेपर्यंत पुणेकरांना ते पहाण्याची संधी आहे. या प्रदर्शनात दुर्मीळ चारचाकी वाहनांच्या छोट्या मॉडेलसह दुर्मीळ दुचाकींची मॉडेलदेखील आहेत, तीसुध्दा पुणेकरांना पहाता येतील.

जोशी यांनी जोपासलेल्या छंदातून हा संग्रह जमा झाला आहे. पर्वती लक्ष्मीनगर येथे राहणारे जोशी यांनी मोटर वाहनांच्या प्रतिकृती जमविण्याचा छंद जपलाय. अगदी काडेपेटीच्या आकारापासून 3 फूट लांब असलेल्या मोटारींच्या प्रतिकृती त्यांच्याकडे आहेत. गेली 27 वर्षे ते आपला हा छंद जपत आहेत. लहानांच्या या वस्तूंचा मोठा संग्रह करण्याचा विचार जोशींना 1986 साली सुचला. 1986 साली त्यांना मर्सिडीझ बेंझ या गाडीची छोटी प्रतिकृती मिळाली, तेव्हापासून जोशी आपल्या दिवाणखान्यातील पार्किंगच्या जागेत विविध मोटारींच्या प्रतिकृती आणून पार्क करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news