कोंढवा : अंत्यविधीची राख पाण्यात नको; झाडांना घाला: ह.भ.प. निवृत्तीमहाराज देशमुख (इंदोरीकर)

कोंढवा : अंत्यविधीची राख पाण्यात नको; झाडांना घाला: ह.भ.प. निवृत्तीमहाराज देशमुख (इंदोरीकर)

कोंढवा; पुढारी वृत्तसेवा: 'कपडे जाळू नका, पाण्यात सोडू नका, अंत्यविधीप्रसंगी पैसे उधळू नका, ते गरिबाला द्या, अंत्यविधीची राख वाहत्या पाण्यात सोडून जलप्रदूषण करण्याऐवजी त्यांच्या नावाने वृक्ष लावून त्याला घाला,' असा संदेश ह.भ.प. निवृत्तीमहाराज इंदोरीकर यांनी दिला. पिसोळी येथील पद्मावती मंदिरामध्ये कै. गणपतराव दगडे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कार्यक्रमामध्ये इंदोरीकर बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन माजी सरपंच स्नेहल गणपत दगडे यांनी केले होते.

या वेळी राष्ट्रसंत योगीराज महाराज परांडे आणि गुरुवर्य जनार्दन जंगले महाराज यांच्या हस्ते दीप्रज्वलन करण्यात आले. तसेच, आवजी महाराज, दिनकर वांजळे, तानाजी कामठे यांचे पाद्यपूजन मारुती दगडे पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणेश पुणेकर, सुभाष टकले, राजेंद्र भिंताडे, भजनी मंडळ व देवस्थान ट्रस्ट, क्षत्रिय मराठा दिंडी, गोर्‍हेकर संस्थान, वैष्णव वारकरी संस्थांचे सहकार्य लाभले. देविदास मासाळ यांनी सूत्रसंचालन केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news