पिंपरी : चारित्र्याच्या संशयातून पत्नीच्या मित्राचा खून | पुढारी

पिंपरी : चारित्र्याच्या संशयातून पत्नीच्या मित्राचा खून

पिंपरी : चारित्र्याच्या संशयातून पत्नीच्या मित्राला चाकूने भोसकून दहाव्या मजल्यावरून फेकल्याने त्याचा मृत्यू झाला. आरोपीवर खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. ही घटना बुधवारी (दि. 26) रात्री साडेदहाच्या सुमारास मोशी येथे घडली. नीलेश अशोक जार्वेकर (35) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी मृताचे भाऊ विजयकुमार अशोकराव जार्वेकर (40, रा. अहमदनगर) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी पंकज शिंदे (35, रा. मोशी) याला अटक केली आहे.

आरोपी हा दोन दिवस गावी जातो, असे पत्नीला सांगून गेला होता. मात्र, तो पत्नीवर पाळत ठेवून होता. पत्नीचा मित्र नीलेश तिला भेटण्यासाठी घरी आला. त्या वेळी आरोपीही त्याच्यापाठोपाठ घरात आला. त्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत नीलेश याच्याशी वाद घातला. टोकदार हत्याराने आरोपीने नीलेशला भोसकून दहाव्या मजल्यावरील घराच्या गॅलेरीतून खाली फेकले.

Back to top button