राजगुरूनगर : ग्राहक पळवल्याच्या रागातून मासे कापण्याच्या कोयत्याने वार | पुढारी

राजगुरूनगर : ग्राहक पळवल्याच्या रागातून मासे कापण्याच्या कोयत्याने वार

राजगुरूनगर : पुढारी वृत्तसेवा :  आपल्या मासे विक्री स्टॉलवर खरेदीसाठी आलेला ग्राहक पळवल्याच्या रागातून दोघांनी दुसऱ्या स्टॉलधारकावर कोयत्याने वार केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी (दि. २८) सायंकाळी ७ वाजता राजगुरूनगर येथे घडली. आमन मोमीन व सुफियान मोमीन उर्फ दुध्या (रा. शिंपीआळी, राजगुरूनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांचे नाव आहे. तक्रादार सोयल रफिक मोमीन (वय २६ वर्ष, रा. मोमीन आळी, राजगुरूनगर)हा जखमी झाला आहे.

खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांचेही मासे विक्री दुकान जवळपास आहे. इकडचे ग्राहक तिकडे गेल्यावर ग्राहकाला फुस लावतो, कमी दराने विक्री करून आमचा ग्राहक पळवतो असा संशय निर्माण होऊन आरोपीनी रागाच्या भरात मासे कट करण्यासाठी असलेल्या हातातील कोयत्याने तक्रादार स्टॉलधारकावर जीवघेणा हल्ला केला आहे. आरोपींना पोलिसांनी अटक केली असल्याचे सहपोलीस निरीक्षक भारत भोसले यांनी सांगितले.

Back to top button