लाखेवाडीत ३ लाख ३३ हजारांचा ऐवज लंपास, सहा चोरट्यांवर गुन्हा दाखल | पुढारी

लाखेवाडीत ३ लाख ३३ हजारांचा ऐवज लंपास, सहा चोरट्यांवर गुन्हा दाखल

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा :  लाखेवाडी (ता. इंदापूर) गावात सहा दरोडेखोरांनी एका कुटुंबाला चाकू, लोखंडी सळई, लोखंडी जंब्या, कोयते, सत्तुर आदीचा धाक दाखवत रोख रक्कमेसह तब्बल ३ लाख ३३ हजार रुपये किमतीचा ऐवज लुटला. कालींदा अशोक कुबडे (वय ३९, रा. लाखेवाडी, ता. इंदापूर) यांच्या फिर्यादीवरुन इंदापूर पोलीस ठाण्यात सहा दरोडेखोरांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, दि. २७ आँक्टोंबर रोजी रात्री अंदाजे २२ ते २५ वयाचे सहा दरोडेखोर हातामध्ये चाकू, लोखंडी सळई, लोखंडी जंब्या, कोयते, सत्तुर, वाकडा कोयता अशा धारदार शस्त्रासह हातात बॅटरी घेऊन फिर्यादी यांचे सासरे ज्ञानदेव सीताराम कुबडे झोपलेल्या खोलीमध्ये घुसले.

ज्ञानदेव कुबडे यांचे गळ्याभोवती लोखंडी जंब्या व डोक्यावर चाकू धरून धाक दाखवुन खोलीमध्ये ३ ट्रन्कमध्ये ठेवलेले ६० हजार रुपये रोख रक्कम, १ लाख लाख रूपये किमितीचे सव्वा दोन तोळ्याचे सोन्याचे गंठन, ५० हजार रुपये किमतीचे सव्वा एक तोळा वजनाचे सोन्याचा मिनी गंठन, २२ हजार रुपये किमतीची अर्ध्या तोळ्याची सोन्याची अंगठी, १६ हजार रूपये किमतीची चार ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, २२ हजार रूपये किमतीची कानातील दोन फुले,आठ हजार रूपये सोन्याच्या दोन रिंगा, ५० हजार रुपये किमतीचे सव्वा तोळा वजनाचे सोन्याचे मणी व डोरलं, चार हजार रुपये किमतीची नथ, दोन हजार रुपये किमतीचे पैजन व एक हजार रूपये किमतीचे पायातील चांदीचे दागीणे असा रोख रक्कमेसह ३ लाख ३३ हजार रुपये ऐवज चोरी केला.

त्यानंतर कालींदा कुबडे यांच्या जाऊ झोपलेल्या खोलीचा दरवाजास जोरात धक्का देऊन तो दरवाजा उघडला. या दरोडेखोरांना त्याच्या हातातील हत्यारांसह पाहिले असता त्यांनी आरडाओरडा केला. त्याच वेळी त्यातील दोघांनी त्यांच्या तोंडावर जोरात बुक्या मारून त्यांना जखमी केले. यासोबत घरातील इतर लोकांना हातातील हत्यारे उगारून धाक दाखवुन जिवे मारण्याची धमकी दिली, तर फिर्यादी यांचा मुलगा याचे डावे पायावर लोखडी सळईने मारून दुखापत केली. याच वेळी अशोक कुबडे हे कोयता घेवुन आल्याचे पाहून या दरोडेखोरांनी तेथुन पळ काढला.

या गुन्हाचा तपास इंदापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रशांत सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे करीत आहेत.

Back to top button