

Saswad News: पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सासवड उपबाजारात बुधवारी (दि. 23) ज्वारीला प्रतिक्विंटलला सर्वाधिक 3 हजार 600 रुपयांचा दर मिळाला, अशी माहिती सभापती शरद जगताप यांनी दिली.
सासवड उपबाजारात गराडे, सोनोरी, दिवे, वाघापूर, खानवडी यांसह संपूर्ण पुरंदर, दौंड, बारामती तालुक्यांतून ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा असे धान्य विक्रीसाठी येते. बुधवारी सासवड उपबाजारात एक नंबर प्रतीच्या ज्वारीला कमाल 3 हजार 600 रुपये, तर दोन नंबर प्रतीच्या ज्वारीला किमान 2 हजार 200 हजार रुपये, तर सरासरी 2 हजार 900 हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला, असे सचिव मिलिंद जगताप यांनी सांगितले.
या वेळी उपसभापती महादेव टिळेकर, संचालक देविदास कामथे, अनिल माने, सचिव मिलिंद जगताप, लिपिक विकास कांबळे, आर. के. ट्रेडर्सचे रूपचंद कांडगे, शेतकरी पंडित टकले, आप्पा शेंडकर, शिवाजी वांढेकर, सुरेश रासकर, शिवाजी कुंभारकर, दशरथ खेसे, अंकुश थोरात, दीपक मोकाशी, लालासाहेब जगताप, सागर भगत आदी उपस्थित होते.