

राष्ट्रीय कृषि शिक्षण अधिस्वीकृती मंडळाच्या येथे पार पडलेल्या 37 व्या बैठकीत 2023 ते 2028 या पाच वर्षांसाठी नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेने येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाला अधिस्वीकृती दिली आहे. विशेष असे की, विद्यापीठाला ‘ए’ ग्रेड / उत्कृष्ट मानांकन दिले आहे.
विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठासह या अंतर्गत विविध महाविद्यालयांना पाच वर्षांसाठी अधिस्वीकृतीसह ‘ए’ ग्रेड/उत्कृष्ट मानांकनाचा बहुमान मिळाला आहे.
विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयातील पदव्यांच्या विविध विषयांसह महाविद्यालयांना मंडळाने अधिस्वीकृती दिली आहे. मानांकन देताना मंडळाने गठीत केलेल्या उच्चस्तरीय समितीने जून महिन्यात विद्यापीठासह विद्यापीठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांना भेट देवून पाहणी केली. त्यावेळी महाविद्यालयांमधील शैक्षणिक सेवा-सुविधांसह प्रयोग शाळांची पाहणी करुन विद्यार्थ्यांशी चर्चा केली होती.
अधिष्ठाता (कृषि) डॉ. दिलीप पवार, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, कुल सचिव डॉ. मुकूंद शिंदे, नियंत्रक सदाशीव पाटील, अभियंता मिलिंद ढोके, नोडल अधिकारी डॉ. एम. आर. पाटील व अधिस्वीकृती प्राप्त कृषि व अभियांत्रिकी महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठातांनी या मानांकनासाठी योगदान दिले आहे.
‘विद्यापीठातील अपुर्या मनुष्यबळाच्या प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन हे मानांकन मिळाल्याचे मोठे समाधान आहे. कृषि शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षणाचे कार्य करणारे शिक्षक व शास्त्रज्ञ या अभिनंदनास पात्र ठरले आहेत.
डॉ. पी.जी. पाटील, कुलगुरु, मफुकृवि, राहुरी