पिंपरी : गाईची कत्तल करणार्‍या चौघांना अटक | पुढारी

पिंपरी : गाईची कत्तल करणार्‍या चौघांना अटक

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: घराच्या पार्किंगमध्ये गाईची कत्तल करणार्‍या चौघांना पोलिसांनी अटक केली. शनिवारी (दि. 23) सकाळी सव्वाआठच्या सुमारास तिरंगा कॉलनी, साईनगर, देहूरोड येथे ही कारवाई करण्यात आली. अनिस शेखलाल शेख (40, रा. मामुर्डी, देहूरोड), नदीम बशीर शेख (31, रा. दत्त मंदिराजवळ, आंबेडकरनगर, देहूरोड), शाहरुख आरिफ कुरेशी (25, रा. देहूरोड), अंकुश मारुती आमले (50, रा. राजीव गांधीनगर, जामा मज्जिद समोर, देहरोड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

आरोपींनी आपसात संगनमत करून कत्तल करण्यासाठी गाई आणल्या होत्या. दरम्यान, अनिस शेख याच्या घराच्या पार्किंगमध्ये असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये आरोपींनी गायची कत्तल करून तिचे मांस रिक्षामध्ये भरले. तसेच, अन्य दोन गायींची कत्तल ते करणार होते.
मात्र, याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींना अटक केली.

Back to top button