तळवडेसाठी वीज उपकेंद्राची उद्योजकांची मागणी | पुढारी

तळवडेसाठी वीज उपकेंद्राची उद्योजकांची मागणी

चिखली: तळवडे भागातील वीज समस्यांनी उद्योजक मेटकुटीला आले असून, वीजसमस्या कायमस्वरूपी सोडविण्याची मागणी उद्योजकांनी महावितरणकडे केली आहे. तसेच, त्याकरिता डियर पार्कच्या वीज उपकेंद्रासाठी आरक्षित असलेल्या जागेवर महावितरणने 220 केव्ही अतिउच्च दाब वीज उपकेंद्र उभारण्याची मागणीह उद्योजकांनी केली आहे.

याबाबतचे निवेदन ज्योतिबानगर इंटरप्रेनर्स असोसिएशनने महावितरणच्या भोसरी विभागाला दिले आहे. तळवडे भागात असलेल्या वीज वाहिन्या, रोहित्रे जीर्ण अवस्थेत असून, ओव्हरलोडमुळे वीजपुरवठा व्यत्यय आणि सातत्याचा अभाव यामुळे उद्योग चालविणे कठीण झाल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. याकरिता उपाययोजना करण्याची आवश्यकता असून, वीज उपकेंद्र उभारणी केल्यास समस्यांचे समूळ उच्चाटन करता येईल, असे उद्योजकांचे म्हणणे आहे. उद्योजकांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी महावितरणला सूचना केल्या आहेत.

तळवडे विभागासाठी उपकेंद्र उभारल्यास त्याचा फायदा आसपासच्या सर्वच भागांसाठी होऊ शकेल. पुढील कारवाई वरिष्ठांच्या सूचनेनुसार होईल.
– अनिल हुलसुरकर, महावितरण शाखाधिकारी, तळवडे

Back to top button