मंचर : बसच्या धडकेत एक जण जखमी

मंचर : पुढारी वृत्तसेवा : पुणे-नाशिक रस्त्यावर एकलहरे येथील एका पादचार्याला एस. टी. बसने धडक दिल्याने ते जखमी झाले. याबाबत मंचर पोलिसांनी एस. टी. बसचालकावर अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. एकलहरे बागवस्ती गावच्या हद्दीत पुणे-नाशिक महामार्गावर काशिनाथ बाजीराव टेमगिरे (वय 45, रा. थोरांदळे) हे पायी जात होते.
या वेळी त्यांना एसटी बसने (एमएच 14 बीटी 3746) धडक दिली. या अपघातात काशिनाथ टेमगिरे हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत बसचालक विनोद बाजीराव जाधव (रा. मालेगाव, जि. नाशिक) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद बाळू भागाजी टेमगिरे (रा. थोरांदळे, ता. आंबेगाव) यांनी दिली आहे.