पुणे :  पोलिस हवालदाराकडून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न

file photo
file photo

पुणे :  पुढारी वृत्तसेवा :  पुण्यात एका पोलिस हवालदाराने पत्नीला ऑमलेट निट बनवता येत नाही म्हणून तिचा गळा दाबून खूनाचा प्रयत्न केल्याचा व मुलगा सोडविण्यासाठी गेल्यानंतर त्याला लाथा बुक्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबधीत पोलिस हवालदारालाच भारती विद्यापीठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मनिष मदनसिंग गौड (50, दत्तविहार सोसायटी, आंबेगाव बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे.

मनिष गौड हा पोलिस मुख्यालयात नेमणुकीस आहे. तर तो आंबेगाव बुद्रुक येथील दत्तविहार सोसायटीमध्ये राहण्यास आहे. बुधवारी (दि. 19) ऑक्टोबर रोजी सात वाजण्याच्या सुमारास मनिष यांच्या पत्नीने त्यांच्यासाठी ऑमलेट बनवले. बनविलेल्या ऑमलेटमध्ये काहीतरी बिघाड झाल्यामुळे मनिष हा पत्नीवर ओरडला त्यांना तुला ऑमलेट निट बनवून देता येत नाही का ? म्हणत शिवीगाळ करून त्यांच्या अंगावर धाऊन गेला. तसेच हाताने मारहाण करून फ्रिजवर ठेवलेली इलेक्ट्रॉनिक पक्कड उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. त्यानंतर दोन्ही हातने फिर्यादीचा गळा दाबून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला. हे सर्व सुरू असताना त्यांचा मुलगा त्यांची भांडणे सोडविण्यासाठी मध्ये पडला असता त्याने मुलालाही लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणात संबंधीत महिलेनी पोलिस ठाण्यात येऊन तिच्यावर हल्ला झाल्याची तक्रार दिल्यानंतर याप्रकरणात खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
       – सचिन धामणे, सहायक पोलिस निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलिस ठाणे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news