बारामती : माजी सरपंच, उपसरपंचांवर सावकारीचा गुन्हा दाखल, महिलेची मालमत्ता बळकावणे आले अंगलट | पुढारी

बारामती : माजी सरपंच, उपसरपंचांवर सावकारीचा गुन्हा दाखल, महिलेची मालमत्ता बळकावणे आले अंगलट

बारामती, पुढारी वृत्तसेवा: पतीला वैद्यकीय उपचारासाठी खर्च झाल्याने अडचणीत आलेल्या महिलेला व्याजाने पैसे देत तिचे रो हाऊस खरेदी खताद्वारे घेत फसवणूक केल्याप्रकरणी शिर्सूफळचे माजी सरपंच, उपसरपंचासह पाच जणांविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात फसवणुकीसह सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भीमराव भिकाजी भंडारे (रा. भंडारेवस्ती, एरंडोली, अहमदनगर), विश्वास आटोळे (माजी सरपंच), अतुल हिवरकर (माजी उपसरपंच) (दोघे रा. शिर्सूफळ, ता. बारामती), संजय निंबाळकर (रा. लासुर्णे, ता. इंदापूर) व ऋतुजा ढवाण (रा. कसबा, बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत भारती संभाजी जाधव (मूळ रा. काटेवाडी, ता. बारामती, सध्या रा. तांबेनगर, बारामती) यांनी फिर्याद दिली. फिर्यादीचे पती बारामती एमआयडीसीतील एका कंपनीत काम करत होते. त्यांच्यावर सन 2012 ते 2014 या कालावधीत बारामतीत विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या औषधोपचाराकामी मोठा खर्च झाला होता. या दरम्यान 7 ऑगस्ट 2014 रोजी फिर्यादीच्या पतीचे निधन झाले. त्यांना अनेकांची रक्कम देणे होते. त्यामुळे रो हाऊसवर कर्ज मिळेल का, याची चौकशी करत असताना त्यांचा मुलगा अभिषेक याच्या मित्राने निंबाळकर व हिवरकर यांच्याशी ‘फायनान्स लोन’संबंधी त्यांची ओळख करून दिली. या दोघांनी फिर्यादीच्या घरी जात त्यांच्याशी चर्चा केली. लोनसाठी रो हाऊसची कागदपत्रे घेतली. संभाजीनगर येथील शुभम फायनान्ससाठी ती घेतली असून, 25 लाख रुपयांचे लोन मंजूर झाल्याचे सांगितले, परंतु फायनान्स कंपनीच्या अधिकार्‍यांना पाच लाख रुपये कमिशन द्या, अशी मागणी केली.

Back to top button