पुणे : मोटारीची काच फोडून लॅपटॉपची चोरी | पुढारी

पुणे : मोटारीची काच फोडून लॅपटॉपची चोरी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मार्केट यार्डात दिवाळी खरेदीसाठी आलेल्या एका व्यक्तीच्या मोटारीची काच फोडून चोरट्यांनी दोन लॅपटॉप, हार्ड डिस्क, तसेच अन्य साहित्य चोरी केल्याची घटना घडली. याप्रकरणी विभीषण गोरुले (वय 33, रा. आंबेगाव, कात्रज) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना मार्केट यार्ड रोड पोस्ट ऑफिसजवळ गुलटेकडी परिसरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोरुले यांची कंपनी आहे. दिवाळीनिमित्त कंपनीतील कामगारांना सुकामेव्याचे बॉक्स खरेदी करण्यासाठी गोरुले मार्केट यार्ड परिसरात आले होते. तेथील टपाल कार्यालयासमोर त्यांनी मोटार लावली होती. चोरट्यांनी मोटारीची काच फोडून मोटारीतील दोन लॅपटॉप, हार्ड डिस्क, आयपॉड, असा एक लाख 45 हजारांचा मुद्देमाल लांबविला. पोलिस उपनिरीक्षक येवले तपास करीत आहेत.

Back to top button