पिंपरी : रिक्षाचालकावर कोयत्याने वार; तिघांविरुद्ध गुन्हा | पुढारी

पिंपरी : रिक्षाचालकावर कोयत्याने वार; तिघांविरुद्ध गुन्हा

पिंपरी : गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याच्या किरकोळ वादातून तिघांनी मिळून रिक्षाचालकाला बेदम मारहाण केली. तसेच, त्याच्यावर कोयत्याने वार केले. ही घटना सोमवारी (दि. 17) मध्यरात्री काळाखडक, वाकड येथे घडली.

संदीप ऊर्फ बाळू शांताराम भोसले (32, रा. काळाखडक, वाकड) असे जखमी रिक्षाचालकाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राहुल विलास चव्हाण (29), गणेश विलास चव्हाण (25), दादा गंगावणे (25, तिघे रा. काळाखडक, वाकड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास त्यांच्या गाडीतून जात होते. दरम्यान, ते काळा खडक येथील पाण्याच्या टाकीजवळ आले असता आरोपीने कार रस्त्यात आडवी लावल्याचे दिसून आले. त्यामुळे फिर्यादींनी कार बाजूला घेण्यास सांगितले. त्यामुळे चिडलेल्या आरोपीने फिर्यादी यांना मारहाण केली.

Back to top button