पिंपरी : ‘पुढारी’ कोल्हापुरी खाद्य-खरेदी धम्माल उत्सवाची उत्साहात सांगता

पिंपरी : ‘पुढारी’ कोल्हापुरी खाद्य-खरेदी धम्माल उत्सवाची उत्साहात सांगता
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  दैनिक 'पुढारी' वृत्तसमूहातर्फे आयोजित व चकोते ग्रुप प्रस्तुत पाच दिवसांच्या कोल्हापुरी शॉपिंग अ‍ॅण्ड फूड फेस्टिव्हलची उत्साहात सांगता झाली. यादरम्यान शेवटच्या दिवशी 'तू चाल पुढं' मालिकेतील शिल्पी म्हणजेच धनश्री कडगावकर हिने महोत्सवास भेट दिली. शाहूनगर येथील बहिरवाडे मैदानावर या खाद्य व खरेदी महोत्सवाचे आयोजन 13 ते 17 ऑक्टोबर दरम्यान सकाळी दहा ते रात्री नऊ पर्यंत केले होते. या महोत्सवाचे सहप्रायोजक लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी, स्मिता हॉलिडेज ट्रॅव्हल पार्टनर, कुंदन ह्युंदाई यांच्या सहकार्याने हा महोत्सव संपन्न झाला.

या महोत्सव दरम्यान कोल्हापूर खाद्य व गृहपयोगी सर्व शॉपिंगच्या उत्पादनांचे स्टॉल या ठिकाणी मांडण्यात आले होते. या महोत्सवामध्ये पिंपरी चिंचवड येथील नागरिकांनी भरघोस खरेदी केली; तसेच कोल्हापुरी खाद्य पदार्थांचा आस्वाद घेत या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्मिता ट्रॅव्हल्सतर्फे दररोज येणार्‍या प्रेक्षकांना 'लकी ड्रॉ' च्या माध्यमातून दररोज पाच प्रेक्षकांना बक्षिसे देण्यात आली. तसेच स्थानिक नागरिकांनी हा 'पुढारी' कोल्हापुरी खाद्य, खरेदी धम्माल महोत्सव पुढारी वृत्तसमूहाने दरवर्षी आयोजित करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. या वेळी धनश्री कडगावकर हिने प्रेक्षकांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. तसेच प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news