तळेगाव स्टेशन परिसरात बेकायदेशीर पार्किंग आणि अतिक्रमण | पुढारी

तळेगाव स्टेशन परिसरात बेकायदेशीर पार्किंग आणि अतिक्रमण

तळेगाव: रेल्वे स्टेशन येथे यशवंतनगरच्या बाजूला सुमारे चार वर्षापूर्वी नगरपरिषद प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत रस्त्यावर झालेली अतिक्रमणे आणि बेकायदेशीर पार्किंगवर कारवाई करून रस्ता व परिसर मोकळा केला होता. आता पुन्हा गेल्या वर्षभरात या रस्त्यावर नो पार्किंगच्या फलकांजवळ बेकायदेशीर पार्किंग झाले असून आजूबाजूला टपऱ्या व इतर अतिक्रमणे वाढली आहेत. रेल्वेने जाणारे अनेक प्रवासी रस्त्याजवळ दुचाकी वाहने लावून जातात ते परत आल्यानंतर ही वाहने घेऊन जातात.

बेकायदेशीर पार्किंगमुळे प्रवाशांना स्टेशन बाहेर ये-जा करण्यास अडचणी निर्माण होत आहे. तसेच अनेक वाहनचालक रस्त्यांवर प्रवाशांची चढउतार करत असतात. प्रशासनाने यावर कार्यवाही करावी अशी नागरिकांची मागणी आहे.

प्रशासनाने तळेगाव स्टेशन परिसरातील यशवंतनगरच्या बाजुकडील मोकळ्या जागेत रितसर पार्किंगची सोय करण्याबाबत कार्यवाही करावी.
– दिलीप डोळस,सामाजिक कार्यकर्ता तळेगाव दाभाडे

Back to top button