पुणे : ऑक्टोबरच्या 12 दिवसांत विक्रमी पाऊस, 15 जिल्ह्यांत अतिवृष्टी | पुढारी

पुणे : ऑक्टोबरच्या 12 दिवसांत विक्रमी पाऊस, 15 जिल्ह्यांत अतिवृष्टी

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  ऑक्टोबर महिन्यात गेल्या पाच वर्षांत यंदा विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. अवघ्या बारा दिवसांतच राज्यातील 15 जिल्ह्यांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मान्सून परतीच्या प्रवासाला निघाला असला तरीही तो राज्यातील उत्तर महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागातून निघाला आहे. मात्र, कोकण व मध्य महाराष्ट्रात मात्र  त्याचा मुक्काम वाढल्याने ऑक्टोबरमध्ये विक्रमी पावसाची नोंद होत आहे.  गेल्या बारा दिवसांत राज्यातील 15 जिल्ह्यांत अतिवृष्टी म्हणजे 60 टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे, तर 9 जिल्ह्यांत मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.

अतिवृष्टीचे जिल्हे (टक्केवारी) : नंदुरबार (118), धुळे (209), जळगाव (156), औरंगाबाद (75), ठाणे (119), मुंबई (178), रायगड (92), कोल्हापूर (76), हिंगोली (63), अमरावती (113), यवतमाळ (113), नागपूर (118), गोंदिया (172), भंडारा (218).
मुसळधार पावसाचे जिल्हे (टक्केवारी) : पालघर (48), सातारा (48), सांगली (49), नगर (43), बुलडाणा (32), लातूर (34), नांदेड (36), वर्धा (56), नाशिक (20). मध्यम पाऊस (टक्केवारी) : पुणे (2), रत्नागिरी (2), सिंधुदुर्ग (18), सोलापूर (15), उस्मानाबाद (18), बीड (14), जालना (12), परभणी (1), गडचिरोली (12). कमी पाऊस : चंद्रपूर (उणे 51 टक्के).

Back to top button