लोणावळा : पुढारी वृत्तपत्र : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शुक्रवारी (दि. 14) रात्री झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाला. अपघातामुळे या मार्गावर काही वेळ वाहतूककोंडी झाली होती. शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास द्रुतगती मार्गावरून मुंबईच्या दिशेने निघालेला ट्रक क्र. (टीएन 31 बीबी 5730) हा खोपोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील किमी 39 येथे आला असताना, उतारावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने त्याने पुढील एक कार व ट्रकला जोरदार धडक दिली. त्यामुळे ट्रक उलटला व त्यामधील सामानाच्या बॉक्सखाली अडकल्याने चालक रमेश (रा. तमिळनाडू) याचा मृत्यू झाला.
दुसरी दुर्घटना पहाटे तीनच्या सुमारास पुणे-मुंबई लेनवर झाला. यामध्ये ट्रक क्र. (टीएन 77 डी 9826) वरील चालकाचा ताबा सुटल्याने त्याने समोरील ट्रकला धडक दिली. यामध्ये केबिनमध्ये अडकल्याने चालक अँड्र्यूस अॅन्थोनी (रा. तमिळनाडू) यांचा मृत्यू झाला. तर, क्लीनर व्यंकट सुब्रमण्यम हे किरकोळ जखमी झाले आहेत.