भोसरीतून दुचाकी चोरीला | पुढारी

भोसरीतून दुचाकी चोरीला

भोसरी: उड्डाण पुलाखाली उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 12) सायंकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली. अजित हनुमंत थोरवे (33, रा. शिरोळी, ता. जुन्नर, जि. पुणे) यांनी गुरुवारी (दि. 13) भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी थोरवे यांनी आपली 25 हजार रुपये किमतीची दुचाकी भोसरी उड्डाणपुलाखाली बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास पार्क केली होती. दरम्यान, सायंकाळी सहाच्या सुमारास दुचाकी चोरी गेल्याचे दिसून आले.

Back to top button