पिंपरी : निगडीत महिलेची पर्स हिसकावली | पुढारी

पिंपरी : निगडीत महिलेची पर्स हिसकावली

पिंपरी : सराफाच्या दुकानातून सोने खरेदी करून चाललेल्या महिलेची पर्स दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेली. ही घटना बुधवारी (दि. 12) रात्री नऊ वाजताच्या सुमारास प्राधिकरण, निगडी येथे घडली. याप्रकरणी एका 47 वर्षीय महिलेने गुरुवारी (दि. 13) निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दुचाकी वरील दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी महिला या सराफाच्या दुकानातून सोन्याचे दागिने खरेदी करून चालल्या होत्या. त्या जिवेश्वर बस थांबाजवळ प्राधिकरण, निगडी येथे आल्या असता दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या हातातील पर्स हिसकावून नेली. या पर्समध्ये 52 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, 10 हजार रुपयांचा मोबाइल आणि एक हजार रुपये रोख असा एकूण 63 हजार रुपयांचा ऐवज होता. तपास निगडी पोलिस करीत आहेत.

Back to top button