पिंपरी : पुढारी शॉपिंग अ‍ॅण्ड फूड फेस्टिव्हलचे शानदार उद्घाटन ; खरेदीसह नागरिकांनी घेतला चविष्ट पदार्थांचा आस्वाद | पुढारी

पिंपरी : पुढारी शॉपिंग अ‍ॅण्ड फूड फेस्टिव्हलचे शानदार उद्घाटन ; खरेदीसह नागरिकांनी घेतला चविष्ट पदार्थांचा आस्वाद

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  मनसोक्त खरेदी आणि कोल्हापुरी पदार्थांचा आस्वाद देण्यासाठी ‘दैनिक पुढारी’ वृत्तसमूहातर्फे आयोजित व चकोते ग्रुप प्रस्तुत कोल्हापुरी शॉपिंग अ‍ॅण्ड फूड फेस्टिव्हलचे गुरुवारी (दि. 13) खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते शानदार उद्घाटन झाले.या फेस्टिव्हलचे मुख्य प्रायोजक असणार्‍या चकोते ग्रुपच्या बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर सुप्रिया डांगे  सहप्रायोजक असणार्‍या लोकमान्य मल्टिपर्पजच्या सुजाता बर्वे, ट्रॅव्हल पार्टनर स्मिता हॉलिडेजचे मॅनेजिंग डायरेक्टर जयंत गोरे आदी उपस्थित होते. या वेळी पुढारी पब्लिकेशन प्रा. लि.च्या संचालिका डॉ. स्मिता योगेश जाधव यांनी मान्यवरांचा स्वागत सन्मान केला.

खासदार बारणे आणि मान्यवरांनी फेस्टिव्हलमधील सर्व स्टॉल्सला भेट दिली. यामध्ये चमचमीत व लज्जतदार खाद्यपदार्थांबरोबर, इलेक्ट्रिक वस्तू, दुचाकी वाहने, गृहोपयोगी वस्तू, खाण्याचे टिकाऊ पदार्थ, चायनीज, कोल्हापुरी भेळ, मिसळ, थालीपीठ, चिकन 65, कपडे, ज्वेलरी आदींचे स्टॉल्स होते. ‘दैनिक पुढारी’ आयोजित व चकोते ग्रुप प्रस्तुत शॉपिंग अ‍ॅण्ड फूड फेस्टिव्हलचे आयोजन 13 ते 17 ऑक्टोबरदरम्यान करण्यात आले आहे. याठिकाणी सकाळी दहा ते रात्री नऊपर्यंत नागरिकांना खाद्य पदार्थांचा आस्वाद आणि खरेदी करता येणार आहेत. उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. खास कोल्हापुरी झणझणीत व चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी नागरिकांची पावले खाद्य महोत्सवाकडे वळत होती.

‘पुढारी’च्या माध्यमातून वाचकांच्या गरजेबरोबरच समाजाची गरज भागविली जात आहे : खा. बारणे
दैनिक पुढारीच्या वतीने कोल्हापुरी खाद्य याचा आस्वाद आणि विक्री हा आगळा-वेगळा उपक्रम आयोजित केला आहे. वाचकांची गरज भागविण्याबरोबरच ही समाजाची एक गरज आहे, ती भागविली जाण्याचे काम पुढारीच्या माध्यमातून होत आहे. दैनिक पुढारीतर्फे नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी चिंचवड शहराच्या मध्यभागी असणार्‍या शाहूनगर याठिकाणी भरविण्यात आलेल्या फेस्टिव्हलमध्ये अनेक महिला भगिनींनी केलेल्या वस्तू आणि खाद्यपदार्थ विक्रीस ठेवण्यात आले आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर याठिकाणी खरेदीचे आणि खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याचे असे केंद्र ‘पुढारी’च्या माध्यमातून उपलब्ध झाले आहे.

कस्तुरी क्लबविषयी मी जाणून घेतले की, यामध्ये 15 हजार महिलांना एकत्र आणण्याचे काम करण्यात आले आहे. महिलांना एकत्र करून त्यांना उद्योगाच्या माध्यमातून एक वेगळं व्यासपीठ निर्माण करून देण्याचे काम केले जात आहे. विरंगुळ्याबरोबरच यातून त्यांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध होत आहे. माझे डॉ. स्मिताताई जाधव यांना आवाहन आहे की, पुण्यात याचा प्रसार केला आहे. पिंपरी चिंचवड शहरातदेखील अनेक महिला भगिनी एकत्र येतील आणि  पुढारीच्या माध्यमातून हा मोठा ग्रुप तयार व्हावा, यासाठी मी शुभेच्छा देतो.

आजचे आकर्षण
या फूड फेस्टिव्हलला दररोज नागरिकांच्या भेटीसाठी मराठी कलाकारांना आमंत्रित करण्यात आले आहे. खाद्यपदार्थाबरोबरच नागरिकांना मनोरंजनाचीदेखील मेजवानी मिळणार आहे. शुक्रवारी (दि. 14) सायंकाळी सहा वाजता झी मराठी चॅनलवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील नेत्रा व अद्वैत म्हणजेच तितीक्षा तावडे व अजिंक्य ननावरे तसेच मुका व सारंग म्हणजेच सानिया चौधरी व रोशन विचारे नागरिकांशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहेत.

‘अप्पी आमची कलेक्टर’च्या कलाकारांची भेट
उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी झी टीव्हीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेतील शेहेनशहा रोहित परशुराम, सरकार प्रदीप कोथमिरे, स्मिता कदम, इजी मयूरी देशमुख यांनी फेस्टिव्हलला भेट दिली आणि नागरिकांशी संवाद साधला; तसेच खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतला.
कधी :
दि. 17 ऑक्टोबर 2022 अखेर
वेळ :
सकाळी 10 ते रात्री 9
स्थळ :
राजर्षी शाहू महाराज ग्राउंड, महाबली मंदिररोड, साईनिकेतन हौसिंग सोसायटी, शाहूनगर, चिंचवड, पिंपरी-चिंचवड.

Back to top button