

"राज्यात अद्याप 518 लाख टन उसाचे गाळप पूर्ण होणे बाकी आहे. सद्यस्थितीत 9 लाख टन प्रतिदिन यानुसार सुरू असलेले ऊसगाळप पाहता फेब्रुवारी महिनाअखेर ऊसगाळप सुरू राहील. शेतकरी संघटनेच्या ऊस दराच्या आंदोलनामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील ऊसतोडणी ही यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीस अत्यंत संथ गतीने सुरू राहिली. त्यामुळे हंगाम पंधरा दिवसांनी वाढून फेब्रुवारीअखेर सुरू राहील.– सचिन बर्हाटे, साहाय्यक संचालक (विकास), साखर आयुक्तालय.