पुणे : मेट्रो करणार ड्रेनेज लाईनची दुरुस्ती | पुढारी

पुणे : मेट्रो करणार ड्रेनेज लाईनची दुरुस्ती

पुणे; पुढारी वृत्तसेवा: डेक्कन परिसरात चुकीच्या पद्धतीने ड्रेनेज लाईनवरच खांब उभारल्यामुळे येथील परिसरातील ड्रेनेज लाईन खराब झाल्या होत्या. त्याची तातडीने दुरुस्ती करून देणार असल्याचे मेट्रो प्रशासनाने सांगितले. मेट्रो प्रशासनाने डेक्कन पुलाची वाडी येथील बाबा भिडे पुलाजवळ ड्रेनेज लाईनवरच स्टेशनवर जाण्यासाठी आवश्यक असलेल्या जिन्याचे खांब उभारले.

त्यामुळे स्थानिक परिसरात असलेल्या इतर ड्रेनेज लाईन तुंबल्या होत्या. यासंदर्भात दै.‘पुढारी’मध्ये नुकतेच वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. त्याची दखल घेत मेट्रो आणि महापालिकेच्या अधिकार्‍यांनी या ठिकाणाची पाहणी करीत येथील वाहिन्यांची दुरुस्ती करून देणार असल्याचे सांगितले. यामुळे स्थानिक नागरिकांनी दै.‘पुढारी’चे आभार मानले आहेत.

डेक्कन, पुलाची वाडी येथील ड्रेनेज लाईनचे डायव्हर्जन करून देण्यात येणार असून, त्याची दुरुस्ती करून देण्यात येणार आहे.
                                            – हेमंत सोनावणे, महाव्यवस्थापक, महामेट्रो

 

Back to top button