दापोडीत बंद सिग्नलचा वाहतुकीला अडथळा | पुढारी

दापोडीत बंद सिग्नलचा वाहतुकीला अडथळा

दापोडी : पुढारी वृत्तसेवा : येथील अकरा नंबर बस स्टॉप येथील बंद सिग्नल वाहतूक विस्कळित होत आहे. तसेच रस्त्यामध्ये गंजलेला डीपी असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. सिग्नल पूर्ण बंद असल्यामुळे वाहनचालकांना अडथळ्याची शर्यत पार करावी लागत आहे. उपनगरांत महापालिका ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत लाखो रुपयांची कामे सुरू आहेत. रहिवाशांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. नागरिकांना मात्र अनेक समस्येचा सामना करावा लागत आहे. प्रशासन मात्र प्रशासन मुग गिळून नागरिकांचा तमाशा बघत आहे. अनेक वेळा तक्रारी देऊनही दखल घेतली जात नाही. फक्त आश्वासनांची खैरात दिली जाते.

चौकातच आई शितळादेवी रिक्षा स्टँड आहे. त्यामुळे नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. बंद असलेला सिग्नल बुजगावणे म्हणून पाहावे लागते. शेजारीच गंजलेला डीपी बॉक्स आहे. यामुळे शाळकरी मुलांना या बॉक्सचा धोका निर्माण होत आहे. चौकामध्ये पावसाचे पाणी साचून राहते. साचलेले पाणी जाण्यासाठी कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही. त्यामुळे ये-जा करणार्‍या वाहनचालक व नागरिकांना चालताना तारेवरची कसरत करावी लागते. या समस्यांकडे संबंधित प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी माजी नगरसेवक संजय काटे यांनी केली आहे.

Back to top button