पिंपरी : फिश फार्मिंगच्या नावाखाली 57 लाख रुपयांचा गंडा | पुढारी

पिंपरी : फिश फार्मिंगच्या नावाखाली 57 लाख रुपयांचा गंडा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : फिश फार्मिंगचा प्रकल्प उभारल्यास मोठ्या प्रमाणात पैसे मिळतील, असे आमिष दाखवून चौघांची 57 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 3 डिसेंबर 2020 ते 11 ऑक्टोबर 2022 या कालावधीत पिंपळे सौदागर येथे घडला.
शकील अब्बास शेख, अब्दुल शकील शेख, शहानवाज दाऊद शेख (सर्व रा. राजुरी, ता. जुन्नर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी नितीन ज्ञानदेव कांबळे (44, रा. हडपसर, पुणे) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्यासह दत्ता मोतीराम कुराडे आणि दोन महिला यांना आरोपींनी सोल अ‍ॅग्रो प्रोडक्ट प्रालि कंपनीच्या माध्यमातून फिश फार्मिंग प्रकल्प उभारून त्याद्वारे मोठ्या प्रमाणात आर्थिक परतावा देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादी आणि त्यांच्या सहकार्‍यांना 57 लाख 70 हजार रुपये गुंतवण्यास भाग पाडून त्यांना परतावा न देता त्यांची फसवणूक केली. सांगवी पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button