वडगावात ओढ्याच्या पाण्यात एकजण गेला वाहून | पुढारी

वडगावात ओढ्याच्या पाण्यात एकजण गेला वाहून

बारामती: पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यात जोरदार पाऊस पडत असल्याने ओढे-नाले भरून वाहत आहेत. वडगाव निंबाळकर येथे ओढ्याच्या पाण्यात एक व्यक्ति वाहून गेल्याची घटना गुरुवारी (दि. १३) घडली.  पोलिस प्रशासन व अन्य सरकारी विभागांच्या मदतीने त्यांचा शोध घेतला जात आहे. नरेश साळवे असे वाहून गेलेल्या ५५ वर्षीय व्यक्तिचे नाव आहे.

बारामती तालुक्याच्या जिरायती भागात गेली दोन दिवस मुसळधार पाऊस पडला. हे पाणी वाकी येथील तलावात आले. वाकीतील तलाव यापूर्वीच पूर्ण भरलेला आहे. त्यामुळे या तलावातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. यामुळे वडगाव निंबाळकर येथील अोढ्याला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. बाजारतळाजवळील पुलावरून साळवे हे रस्ता अोलांडत असताना पाण्याच्या प्रवाहामुळे ते खाली खेचले गेले. त्यांचा शोध घेतला जात आहे.

Back to top button