भूसंपादनाची अधिसूचना दिवाळीपूर्वी ! पुरंदर विमानतळाचा नकाशा एमआयडीसीकडे सुपूर्त

भूसंपादनाची अधिसूचना दिवाळीपूर्वी ! पुरंदर विमानतळाचा नकाशा एमआयडीसीकडे सुपूर्त
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुरंदर विमानतळ जुन्या जागेवरच होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. आता भूसंपादनाबाबतची सर्व माहिती जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (एमआयडीसी) दिली आहे. एमआयडीसी त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करीत असून, दिवाळीपूर्वी भूसंपादनाची अधिसूचना प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. राज्य सरकार आणि उच्चस्तरीय समितीकडून मंजुरी प्रस्ताव प्राप्त होताच अधिसूचना काढण्यात येईल. दिवाळीपूर्वी ही अधिसूचना निघेल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

पुरंदरच्या 2 हजार 832 हेक्टर जागेचा नकाशा, तसेच सर्व संकलित केलेली माहिती एमआयडीसीला देण्याची सूचना राज्य शासनाने केली होती. आता एमआयडीसीकडून विमानतळाच्या भूसंपादनाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जात आहे. पुरंदर विमानतळ आणि लॉजिस्टिक पार्कसाठी अनुक्रमे 2832 हेक्टर आणि 3103 हेक्टर जमीन संपादित करण्याचे उद्दिष्ट आहे.

जिल्हा प्रशासनाकडील विमानतळाशी संबंधित माहिती एमआयडीसीला देण्यात आली आहे. राज्य सरकार एमआयडीसी कायद्यानुसार भूसंपादन करणार आहे. त्या संदर्भात लवकरच अधिसूचना निघण्याची शक्यता आहे.
                                                              – डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी पुणे

तीनपटीने वाढले खरेदी-विक्री व्यवहार
पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संभाव्य जागेवरील खरेदी-विक्री व्यवहारांवर कोणत्याही प्रकारची बंदी अद्याप घालण्यात आलेली नाही. गेल्या तीन वर्षांची आकडेवारी पाहिल्यास तीनपटीने खरेदी-विक्री वाढली आहे. आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये पुरंदर तालुक्यातून मुद्रांक शुल्कापोटी सुमारे 25 कोटी 69 लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये हा आकडा 112 कोटी 73 लाख रुपयांपर्यंत पोहचला. सन 2019-20 आणि सन 2020-21 या दोन्ही आर्थिक वर्षांमध्येही पुरंदर तालुक्यातील खरेदी-विक्री व्यवहारांमधून 115 कोटींच्या आसपास उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत शंभर कोटींचा महसूल जमा झाला आहे.

व्यवहारांना बंद करता येत नाही

'जोपर्यंत भूसंपादनाची अधिसूचना काढण्यात येत नाही तोवर कायद्यानुसार प्रकल्प होणार्‍या जमिनींवरील खरेदी-विक्री व्यवहारांना बंदी घालता येत नाही. एमएडीसीकडून भूसंपादन अधिसूचना काढण्यात आली नव्हती. त्यामुळे संबंधित जमिनींवरील खरेदी-विक्री व्यवहारांना बंदी घालण्यात आलेली नाही. आता एमआयडीसीकडून भूसंपादन अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतरच खरेदी-विक्री व्यवहार बंद करण्यात येतील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news