पिंपळे गुरवमधील समस्यांचा पाढा सुटणार का? | पुढारी

पिंपळे गुरवमधील समस्यांचा पाढा सुटणार का?

पिंपळे गुरव, पुढारी वृत्तसेवा: परिसरातील अर्धवट कामांचा त्रास सद्या स्थानिकांना होत असल्याचे दिसून येत आहे. रस्त्याची दुरवस्था आणि अपूर्ण कामांचा फटका नागरिकांना बसत असल्याने प्रशासनाने लवकरात लवकर हा प्रश्न सोडवण्याची मागणी स्थानिकांतून केली जात आहे.

पिंपळे गुरव भागातील अमृता कॉलनी रस्ता खाचखळगे आणि खड्डे पडल्यामुळे पादचार्‍यांना चालताना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. तसेच अनंतनगर भागातील डी वाईन शाळा रस्ता दुरवस्था असल्याने शालेय विद्यार्थ्यांना चालणे अवघड झाले आहे. बँक ऑफ महाराष्ट्र आणि कल्पतरू इस्टेट, भीमा शंकर कॉलनी भागातील पदपथाचे काम रखडल्याने पादचार्‍यांना पदपथ कधी उपलब्ध होणार, अशी विचारणा केली जात आहे.मुक्तांगण लॉन्स, मोरया पार्क भागात वारंवार कचर्‍याचा ढीग परिसरात होत असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पिंपळे गुरव भागातील समस्यांचा पाढा प्रशासकीय काळात सुटेल का, हे पाहावे लागेल.

धीम्या गतीच्या कामामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. लवकरात लवकर अपूर्ण कामे पूर्ण होण्याची गरज आहे. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे.
– श्रीकृष्ण फिरके, ज्येष्ठ नागरिक

महानगरपालिकेच्या जनसंवाद सभेत नुकतेच या विषयावर प्रश्न मांडण्यात आले होते आणि समन्वय अधिकार्‍यांशी चर्चा केली. रखडलेली कामे वेळेत पूर्ण करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
– श्याम जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष

Back to top button