पिंपरी : खासगी प्रवासी वाहनांवर कारवाई | पुढारी

पिंपरी : खासगी प्रवासी वाहनांवर कारवाई

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरात खासगी वाहतूकदारांकडून दिवाळीनिमित्त भाडेवाढ करीत असल्याने ‘खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची हंगामी लूट’ अशा मथळ्याची बातमी दै. ‘पुढारी’ने मंगळवार (दि. 11) रोजी प्रसिद्ध केली. या बातमीची दखल घेत शहरातील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने खासगी वाहनांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. एकूण 120 वाहनांची तपासणी केली असून, साडेतीन लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.

नाशिक येथील खासगी वाहनाची दुर्घटना झाल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील परिवहन विभागाच्या वतीने महामार्गावर खासगी वाहन तपासणी मोहीम आखली आहे. परिवहन विभागाच्या नियमांची पायमल्ली करणार्‍या वाहनांवर आरटीओच्या वतीने कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी दिली आहे.

हे नियम टाळणार्‍या वाहनांवर कारवाई
परिवहन विभागाचे नियम डावलून भाडेवाढ
वाहनांमध्ये आपत्कालीन मार्ग नसलेले वाहन
अग्निरोधक सामग्रीची सुविधा नसल्यास
प्रथमोपचार पेटी उपलब्ध नसल्यास
वाहनाचे फिटनेस व परमिट नसल्यास
वाहनचालकाने वाहन चालविताना सीटबेल्ट परिधान न केल्यास

Back to top button