पुणे : किरकोळ वाद उठताहेत जिवावर प्रेमास नकार, पूर्ववैमनस्य, धक्का लागलो अशा बाबी ठरताहेत कारणे | पुढारी

पुणे : किरकोळ वाद उठताहेत जिवावर प्रेमास नकार, पूर्ववैमनस्य, धक्का लागलो अशा बाबी ठरताहेत कारणे

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  समाजातील संवेदनशीलता दिवसेंदिवस हरवत चालल्याचे दिसून येत आहे. कारण रस्त्यात चालताना धक्का लागला, पूर्वी एखाद्या मुद्द्यावरून वाद झाला, मिरवणुकीत पुढे सरकण्यास सांगतिले अशा किरकोळ कारणावरून शस्त्राने वार करून जीवे मारण्याच्या घटना सर्रास घडत आहेत. त्यामुळे किरकोळ वादही आजच्या तरुणाच्या जिवावर उठताना दिसत आहेत.

पुढे चला’ म्हटल्यावरून वार

पुणे : सासवड येथे गणपती विसर्जन मिरवणुकीत ‘पुढे चला’ म्हटल्याच्या रागातून तरुणावर धारदार हत्याराने वार केल्याप्रकरणी अतुल अशोक जगताप (वय 36, रा. सासवड पोलिस लाइन समोर, पुरंदर) याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.
सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा आदेश दिला. जगतापसह बारा जणांविरोधात सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  यात विक्रम ऊर्फ विकी जगताप (रा. सासवड) जखमी झाला असून, याबाबत त्याच्या भावाने फिर्याद दिली आहे. ही घटना 9 सप्टेंबर रोजी सकाळी नऊच्या सुमारास सासवड परिसरात घडली.

सासवडमधील हुंडेकरी चौकात गणपती विसर्जन मिरवणुकीत फिर्यादींच्या भावाने आरोपी कौशिक जगतापला ‘पुढे चला’ असे म्हटले. त्या रागातून कौशिकने त्याच्या साथीदारांना आपल्या कार्यालयात बोलावून घेतले. जामिनासाठी अर्ज केलेल्या अतुल जगताप याने फिर्यादींच्या भावाला फोन करून ‘तुला भांडण वाढवायचे आहे की मिटवायचे आहे,’ असा दम दिला, तसेच त्याला कौशिकच्या कार्यालयात बोलावून घेतले. तिथे आरोपींनी विकी जगतापला दमदाटी करत धारदार शस्त्राने, मारहाण केली. या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या अतुल जगताप याने जामिन अर्ज केला. त्याला अतिरिक्त सरकारी वकील संतोषकुमार पताळे यांनी विरोध केला.

Back to top button