पिंपरी : गुरुवारी सायंकाळी पाणीपुरवठा बंद | पुढारी

पिंपरी : गुरुवारी सायंकाळी पाणीपुरवठा बंद

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील मुख्य जलवाहिनीमध्ये बिघाड झाला आहे. त्याची दुरुस्ती करण्यात येणार असल्याने गुरुवारी (दि.13) शहराचा सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच, दुसर्‍या दिवशी शुक्रवारी (दि.14) सकाळचा पाणीपुरवठा अनियमित असणार आहे. रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील मुख्य जलवाहिनीचे काम करायचे असल्याने शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे.

त्यामध्ये थेरगाव, काळेवाडी, विजयनगर, रहाटणी, वाकड, पिंपळे सौदागर, कुणाल आयकॉन टाकीवरील भाग, पिंपळे निलख, विशालनगर, पुनावळे, ताथवडे, रावेत सेक्टर 29 च्या टाकीवरील भागासह, किवळे, मामुर्डी, विकासनगर, सांगवीतील जिल्हा रुग्णालय या भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. तसेच, म्हाळुंगे-बालेवाडी स्टेडियम, निगडी प्राधिकरण, सेक्टर क्रमांक 21 ते 28, आकुर्डी, खंडोबा माळ, मोहननगर, रामनगर, संभाजीनगर, शाहूनगर, इंद्रायणीनगर, पांजरपोळ, बोर्‍हाडेवाडी, मोशी, डुडुळगाव, वडमुखवाडी, चोविसावाडी, जाधववाडी, कुदळवाडी, फुलेनगर, शिवतेजनगर, पूर्णानगर, शरदनगर, सुदर्शननगर, नेवाळे वस्ती, हरगुडे वस्ती. पवार वस्ती, रुपीनगर, चिखली या भागांतील पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे.

या भागामध्ये गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा होईल. त्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे शहरातील या भागातील सायंकाळी पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे सायंकाळी पाणीपुरवठा होणार नाही. दुसर्‍या दिवशी सकाळी शुक्रवारी या भागात सकाळी पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. नागरिकांनी त्यांच्याकडे असलेले पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी
केले आहे.

Back to top button