तळेगाव दाभाडे : परिसरात खरीप भातपिकाच्या वाढीच्या अंतिम टप्प्यात पाऊस पडल्याने पीक जोमात आले आहे. या आठवड्यात मावळ तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. भातपीक वाढीच्या अंतिम टप्प्यात हा पाऊस उपयुक्त असल्याने शेतकरी आनंदीत झाले आहेत. यावर्षी मावळ तालुक्यात भातपीक जोमात आले आहे. खरीप भातपीक येत्या तीन ते चार आठवड्यांत कापणीसाठी तयार होण्याची शक्यता आहे. मावळ तालुक्यात भात हे मुख्य पीक असून, याला बाजारमूल्यही खुप असल्यामुळे प्रामुख्याने शेतकरी याच पिकाची लागवड करताना दिसून येत आहे.