तळेगाव परिसरात पावसाने जनजीवन विस्कळीत | पुढारी

तळेगाव परिसरात पावसाने जनजीवन विस्कळीत

तळेगाव स्टेशन; पुढारी वृत्तसेवा: तळेगाव दाभाडे परिसरात ११ ऑक्टोबरला सुमारे दु.११वा. पासुन ढगांच्या गडगडाटांसह जोरात पाऊस येत असुन जनजीवन विस्कळीत झाले आहे. सकाळी आकाश निरभ्र होते उनही पडले होते अचानक ढग आले आणि जोराचा पाऊस सुरु झाला आहे. अधून मधुन उनही पडत आहे. उन पडले की नागरिक दैनंदिन कामासाठी बाहेर पडत आहेत, परंतु अचानक पाऊस येत असल्यामुळे त्यांची तारांबळ उडत आहे.

सोमवारी(दि.१०)देखील दिवसभर उन-पावसाचा खेळ चालु होता. या उन-पावसाच्या वातावरणामुळे तळेगाव दाभाडे परिसरातील नागरिकांचे जनजीवन ऐन सणासुदीच्या कालावधीत विस्कळीत झालेले आहे. पावसामुळे विद्युत लाईनवरही सतत फॉल्ट होत असल्यामुळे वीजपुरवठ्यास अडथळे येत असुन त्याचाही उद्योग धंद्यावर, व्यावसायांवर परीणाम होत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत पोहचणे आणि शाळा सुटल्यानंतर वेळेत घरी येण्यास अडचणी येत असल्यामुळे पालकांवर ताण येत आहे.

 

Back to top button